Jump to content

User:Subhashrathod23

From Wikipedia, the free encyclopedia

● प्रा. पी. टी. चव्हाण

विमुक्त – भटके, उपेक्षित, वंचितांचे लोकनेते, आपल्या अनोख्या कार्यशैलीचा वेगळ्या प्रकारे जनमानसात ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक धडाडीचे, उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. पी. टी. चव्हाण सर.. तांडे, पाडे, पालनिवासी, दुर्लक्षित, वंचित, निराधार, बहुजन व भटक्या – विमुक्तांच्याप्रती अत्यंत संवेदनशील असलेले प्रा. पांडुरंग थावरा चव्हाण हे महाराष्ट्रातील एक सर्वश्रुत नेते. ‘प्रा. पी. टी. चव्हाण' याच नावाने जनमानसातील त्यांची ओळख. तसेच ‘भटके – विमुक्त व बहुजन बांधवांचे नेते’ अशीच त्यांची खरी ओळख. कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व व परिश्रमाच़्या बळावर जनमानसात आपल्या कार्याचा ठसा उमटवता येऊ शकतो या विचारावर गाढ श्रद्धा असलेले, त्यासाठी सायास करावे लागतात. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे !’ ही समर्थांनी दासबोधात सांगितलेली उक्ती प्रा. पी. टी. चव्हाण सरांच्या बाबतीत सार्थ ठरते. कोणतीही चळवळ ही निःस्वार्थी हेतूने उभारलेली असावी. ती जनहितासाठी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, लोकांच्या दुःखाचा निरास करून त्यांना स्वाभिमाने जगता आले पाहिजे, यासाठी असली पाहिजे. चळवळीचा उद्देश विधायक स्वरूपाचा असला पाहिजे हाच प्रा. पी. टी. चव्हाण सर यांनी केंद्रस्थानी मानलेला विचार.. महात्मा फुले - शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे. पेशाने ते प्राध्यापक असून आपली नोकरी सांभाळत त्यांच्यातील एक उमदा कार्यकर्ता समाजसेवक घडत गेला. गेल्या अनेक वर्षांपासून ते भटके – विमुक्तांच्या चळवळीत सक्रिय आहेत.

● कौटुंबिक पार्श्वभूमी -

अत्यंत प्रतिकूल, हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या प्रा. पी. टी. चव्हाण यांचा जन्म मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या ‘रामुनाईक तांडा, केकत पांगरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव थावरा नाईक व आईचे नाव चंपावतीबाई होते. त्यांचे कुटुंबीय गरीब ऊसतोड मजूर होते. आई - वडील, सात भाऊ व दोन बहिणी असा त्यांचा मोठा परिवार. ५ पिढ्यांपासून त्यांचे पूर्वज केकत पांगरी तांड्यावरच वास्तव्य करीत आलेले. त्यांचे आजोळ सुद्धा तेच. त्यांचे मामा रामुनाईक हे केकत पांगरी तांड्यांचे नाईक. आजही हा तांडा त्यांच्या मामांच्या नावाने ‘रामुनाईक तांडा’ याच नावाने ओळखला जातो.

● जन्म - ७ ऑगस्ट १९६७, केक त पांगरी, गेवराई जि. बीड मराठवाडा ● शिक्षण - एम. ए. ( हिंदी ) बी. एड्. एस. आय. ● पेशा - समाजिक कार्य व राजकारण, समाजकार्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून स्वेच्छानिवृत्ती ) ● शालेय व महाविद्यालयीन शिक्षण - रामुनाईक तांडा, केकत पांगरी, जालना, गेवराई, बीड, मुंबई

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण :

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण  : प्राथमिक शिक्षण रामुनाईक तांडा, केकत पांगरी, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण जालना, गेवराई, बीड, मुंबई येथे झाले.


शिक्षण - एम. ए. ( हिंदी ) बी चंपाबाई हे होते. ड., एस. आय. ●

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण : केकत पांगरी, जालना, गेवराई, बीड, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले.