Jump to content

User:Sachinsb1980

From Wikipedia, the free encyclopedia

लोकनेते ऍड. दत्ता पाटील ( दादा ) Loknete Adv. Datta Patil ( Dada )

[edit]
Loknet Adv. Datta Patil

जन्म: [ Birth ] ४ मार्च १९२६ रोहा जिल्हा रायगड [ तत्कालीन कुलाबा ]

[edit]

वडील: [ Father ] नारायण नागो पाटील (आप्पासाहेब), शिक्षक शेतकरी, कामगार, दलित यांच्या उद्धारासाठी तळमळ. जगातला पहिला शेतकऱ्यांचा संप यशस्वी केला. शासनाला कुळ कायदा करण्यास भाग पाडले. मुंबई राज्य विधिमंडळाचे सदस्य (आमदार ). अध्यक्ष, जिल्हा परिषद ( तत्कालीन लोकल बोर्ड ). कोकण एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका. संस्थापक संपादक: साप्ताहिक नव  कृषीवल ( आत्ताचे दैनिक कृषीवल ) ज्येष्ठ नेते: शेतकरी कामगार पक्ष ..

[edit]

आई: [ Mother ] लक्ष्मीबाई नारायण पाटील, शिक्षिका , मुख्याध्यापिका.

[edit]

शिक्षण: [ Education]एल.एल.बी. ( वकील )

[edit]

व्यवसाय: [ Occupation ] वकिली, १८ एप्रिल १९५० पासून सुरुवात महाराष्ट्रातील निष्णांत फौजदारी वकील म्हणून प्रसिद्ध. गोरगरिबांची फुकट वकील करत म्हणून फुकट्या वकील अशी उपाधी. वकिलीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालुक्यात तसेच जिल्ह्यात रुजवला व वाढवला. 20 एप्रिल २००० रोजी वकील व्यवसायात पन्नास वर्षे पूर्ण, बार असोसिएशन रायगड तर्फे सन्मानित

[edit]

छंद: [Hobbies] वाचन, पर्यटन

[edit]

विवाह: [Marriage] ११ फेब्रुवारी १९५१, अलिबाग, जिल्हा-रायगड

[edit]

पत्नी: [ Wife ]सौ. पुष्पा ( माई ) पूर्वाश्रमीच्या कुमारी पुष्पा रामचंद्र पाटील, बी.ए., गृहिणी. घर संसार सांभाळून वकिली, समाजकारण, राजकारण यामध्ये दादांना संपूर्ण साथ.

[edit]

संतती : [ Son ] श्री प्रमोद (पत्नी: सौ शैला). श्री संजय (पत्नी: सौ शीतल). कै. शिरीष.

[edit]

राजकीय कर्तृत्व: [ Political Achievements ]  आमदार, विधानसभा : १९५७, १९६७, १९७८, १९८०, १९८५, १९९० (एकूण २७ वर्षे). सदस्य: पंचायत राज समिती विधानसभा सदस्य: विशेष अधिकार समिती, विधानसभा. अध्यक्ष: लोक लेखा समिती, विधानसभा (पब्लिक अकाउंट कमिटी). सदस्य: सभापती तालिका, विधानसभा. सदस्य: विद्यापीठ कायदा समिती, महाराष्ट्र. विरोधीपक्ष नेते, विधानसभा: १९८७,१९८९ (२ वेळा) ज्येष्ठ नेते: शेतकरी कामगार पक्ष. 

[edit]

राजकीय आंदोलने: [ Political Movements ] विविध सामाजिक आंदोलनात राजकीय लढ्यात अनेक वेळा तुरुंगवास. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी लढा. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप प्रकरणी आंदोलन, आदिवासींच्या दळी जमिनींसाठी आंदोलन, सेझ विरोधी आंदोलन असे एक ना अनेक लढे. १९५८ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात आठ महिने धारवाडला तुरुंगवास. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली तुरुंगवास.

[edit]

सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्य: [ Work in Social and Co-operative Sector] अध्यक्ष: कुलाबा मॅटरनिटी हॉस्पिटल, अलिबाग. चेअरमन: भूविकास बँक, कुलाबा जिल्हा. चेअरमन: कृषी उत्पन्न बाजार समिती, अलिबाग. संस्थापक चेअरमन: रायगड बाजार, अलिबाग.

[edit]

शिक्षण क्षेत्रातील योगदान: [ Contribution in the field of Education ] अध्यक्ष: कोकण एज्युकेशन सोसायटी, अलिबाग. अध्यक्ष: जनता शिक्षण मंडळ, अलिबाग. रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात  प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, ३ महाविद्यालय, २ होमिओपॅथी वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी व विधी महाविद्यालय सुरू केली. उत्कृष्ट वक्ते व वक्तृत्व कलेचे चाहते

[edit]

परदेश प्रवास: [ Foreign Travel ] रशिया: इंडो सोव्हिएत असोसिएशनच्या वतीने आयोजित आमदारांच्या दौऱ्यात सहभाग जर्मनी: मुद्रण तंत्रज्ञान परिषदेत सहभाग. नेपाळ: नेपाळ सरकारकडून  निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून निमंत्रित. रशिया: पुनर्भेट रशियन कल्चरल सेंटर तर्फे विशेष दौरा. इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, सिंगापूर, मलेशिया, हॉंगकॉंग, मकाव येथे पर्यटन.

[edit]

निधन: [Death] २७ ऑगस्ट २०११, अलिबाग, जिल्हा-रायगड.

[edit]
Datta Patil's life information