Jump to content

User:Ravindrabaraskar

From Wikipedia, the free encyclopedia
दक्षिण महाकालिका देवी शक्तीपीठ

शिरसिंगी, कर्नाटक

भारतात कालिका देवीची प्राचीन जागृत दोनच शक्तीपीठ आहेत त्या पैकी कलकत्ता येथील श्री महाकाली देवी , आणि दुसरी दक्षिण भारतातील कर्नाटकात असलेली शिरसिंगी येथील श्री दक्षिण कालिका देवी, हिचे सोवळे कडक असून फक्त पुरणवरणाचा नैवेद्य चालतो.

विश्वब्राम्हण ज्ञातीच्या पाच गोत्र पैकी प्रत्न गोत्र ऋषी हे महर्षी अंगिरसाचे वंशज सकल वेद पारंगत रहू गण यांचे पुत्र. या गोत्रातील देवता परब्रह्म स्वरूप इंद्र होय. याच गोत्रातील विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग ऋषी होय. विभांडक ऋषींचे वास्तव्य कर्नाटकातील शुंगेरी परिसरात होते. दिव्य तेजस्वी ऋषीश्रेष्ठ तपस्वी अशा ऋषशृंग ऋषींनी शिरसंगीच्या पर्वत वन प्रदेशात घनघोर तपश्चर्या करून कालिका मातेला प्रसन्न केले होते.

            याच महाकालिका देवीचे उपासक असलेल्या ऋष्यशृंग ऋषींनी  महाभारत काळात  राजा दशरथाला अपत्य प्राप्ती होत नव्हती म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञाचे स्वतः पौरोहित्य केले होते. अयोध्येचा राजा दशरथाचे कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांनी  राजा दशरथ यांस  अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास सांगितले व त्यासाठी दक्षिणेकडे असलेले अथर्ववेदाचे महान ज्ञाता तपस्वी महर्षी ऋष्यशृंग  यांचे कडे पाठविले , शिरसिंगी येथे त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. दशरथ राजा आणि राण्यास  प्रसाद ही दिला.  तदनंतर यथावकाश राजा दशरथाच्या घरी भगवान श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांनी जन्म घेतला.
            शिरसिंगी वन प्रदेशात राहणाऱ्या  तपश्चर्यl करणाऱ्या ऋषींनी दैत्याची फार पीडा होत असल्याचे ऋष्यशृंग ऋषींना सांगितले असता त्यांनी या संकटातुन सुटकेसाठी महाकालीची मनोमन प्रार्थना केली. तेंव्हा देवीने रौद्र रूप धारण करून अष्टभुजा महाकालीने कुमिर, सुमीर, चुलोक, नुगुंद, नलुंद इत्यादी नऊ दैत्यांचा घनघोर युद्ध करून नाश केला. सर्व दैत्यांचा संहार करून शिरसिंगी येथे देवीचे आगमन झाले. ऋष्यशृंग ऋषींनी कालीमlतेची स्तुती करून मातेस प्रसन्न करून वर मागितला की त्या पवित्र ठिकाणी स्थानापन्न होऊन समस्त भक्तांचे आणि विशेषतः माझ्या कुलातील तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांचे कल्याण करून कृपादृष्टी असो , देवीने तथास्तु म्हटले तेव्हा पासून श्री कालिकादेवी तेथे सर्व भक्तांच्या कल्याणासाठी विराजमान झालेली आहे.

तेंव्हा पासून शिरसिंगी येथील श्री कालिका देवी भारतातील समस्त विश्वब्राम्हण, दैवज्ञब्राह्मण, पांचाल ब्राह्मण ज्ञातीची ती कुलदेवता आहे. नंतर भक्तांनी त्या जागृत स्थानी देवीचे सुंदर असे भव्य मंदिर उभारले.

ऋष्यशृंग ऋषींचे वास्तव्य वरून त्या स्थानाचे नावं अपभ्रंश होऊन शिरशृंग पुढे शिरसिंगी असे झाले. हे स्थान कर्नाटकातील बेळगाव जिल्यातील सौंदत्ती तालुका येथील रेणुकादेवी स्थान पासून 20 किलोमीटर वर आहे. शिरसिंगी येथील कालिका देवी ही दक्षिण कालिका म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीस सोवळ्यात पुरणावरणाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या प्राचीन मंदिरातील वंश परंपरागत पुजारी पुरोहित हे फक्त पांचाल विश्वब्राम्हण आहेत.

       श्री कालिका देवीची मूर्ती काळ्या शाळीग्राम पाषाणात नऊ फुट उंचीची भव्य सुबक तेजोमय सुंदर मुर्ती उंच पिठासनावर स्थापीत केलेली आहे. आज जे  भव्य असे प्राचीन मंदिर दिसत आहे ते इसवीसनाच्या पहिल्या शतकात म्हणजे 2000 वर्षे पूर्वीचे बांधलेले आहे.  मंदिराच्या आवारात कमठेश्वर महादेव मंदिर, कालभैरव मंदिर, सूर्यनारायण, भगवान गणेश, कार्तिक स्वामी, सप्तमातृका देवी आदी देवता आहेत.

प्रातः समयी शिरसिंगी येथील श्री कालिका देवीचा सुंदर अभिषेक केला जातो. पूजेनंतर देवीला भक्तांकडून आलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या नऊ साड्या नेसवून दागदागिने घालून अलंकृत केले जाते. (नऊ साड्या देवीच्या भव्य मूर्तीस एकाच वेळेस नेसवतात ) पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पूजा, अभिषेक,आरती कुंकुमार्चन इत्यादी सेवा अखंडपणे चालू असते.

गुढीपाडवा सणाला तिकडे "युगादी" म्हटले जाते. त्या दिवशी भक्तगण आपल्या शेतात पिकवलेले नवीन गहू देवीस अर्पण करतात. त्या दिवसापासून नवीन धान्याचा वापर केला जातो. या पाच दिवसात देवीच्या प्रतिमेची पूजा करून पाच दिवस अखंड दीपप्रज्वलन करतात. घटाची स्थापना करून नवरात्र उत्सव साजरा करतात पंचमी ला सांगता होते. फाल्गुन अमावस्या पासून पाच दिवस उत्सव चालतो. ध्वजारोहण केले जाते.

चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर देवीची पालखी मंदिर परिसरातील खड्ग तीर्थ येथे जाते. देवीची उत्सवमूर्ती आणि तलवारी आदी शस्त्रे यांना खड्ग तीर्थात स्नान घातले जाते. नंतर मंदिरात परत गेल्यानंतर मूर्तीला पंचामृत महाभिषेक पूजा केली जाते. नंतर पुरोहितांच्या सुवासिनी हस्ते सोवळ्यात तांदळाचा भात शिजवून त्याचे डोक्याच्या आकाराचे नऊ मोठे गोळे केले जातात. त्याची हळद कुंकू सुगंधी द्रव्य लावून मंदिरात पूजा केली जाते. मंदिरातील बुत्तीकट्टा नावाच्या दगडी चौथऱ्यावर नऊ गोळे ठेऊन पूजा केली जाते. गोळे लाल कुंकूने माखले जातात. नंतर कालिका मंदिराचे वंशपरंपरागत नऊ विश्वब्राम्हण पुजारी सोवळ्यात हाती नऊ तलवारी घेऊन योध्याच्या आवेशात येऊन आणि आपल्या हातातील तलवारीने देवींनी राक्षसाचे मुंडके उडवले होते त्या प्रमाणेच भाताचे नऊ गोळे आकाशात उडवतात. त्या भाताच्या गोळ्या वर तलवारीने प्रहार केला जातो. अशी आख्यायिका आहे की, त्या तील एक गोळा अदृश्य रूपाने कांची कामकोटीच्या कामाक्षी देवी मंदिरात पडतो, दुसरा कालाहस्तीच्या महाकालेश्वरीच्या मंदिरात पडतो, तिसरा गोळा मदुरेच्या मीनाक्षी देवी मंदिरात पडतो उरलेले दोन गोळे अदृश्य होतात. राहिलेले भाताचे गोळे शिरसिंगी मंदिर आवारात प्रसाद स्वरूपात पडतात. ओंजळी पुढे करून प्रसाद प्राप्ती साठी भक्त जण धाव घेतात. तोच प्रसाद उर्वरित भाविकांना वाटले जातात. भक्त आणि भाविक देवीच्या कृपा प्रसादाने धन्य होतात.

देवीच्या उत्सव सोहळ्यात विश्वब्राम्हण ज्ञाती शंकराचार्य आणेगुंडी महासंस्थान सरस्वती पीठ काठपाडी उडुपी चे जगद्गुरू कालहस्तेंद्रचार्य सरस्वती महास्वामींजी तसेच आर्मेन्डहळ्ळी पिठाचे जगद्गुरू शिवसुज्ञानतीर्थ महास्वामींजी यांचे उपस्थितीत संपन्न होतो.

विश्वकर्म कुलैश्वर्ये त्वाष्ट्ररुपे नमोsस्तुते ! शिरःशृंगी कालिकायै महाविद्ये नमोsस्तुते !! 🌺🙏🏻

Cite error: There are <ref> tags on this page without content in them (see the help page).संदर्भ - स्कंद पुराण, रेणुका महात्म्य. कालिका महात्म्य.

      संकलन लेखक 
 © ®  रविंद्र बारस्कर (वेदपाठक)
       औरंगाबाद.