Jump to content

User:Nileshjoshi555

From Wikipedia, the free encyclopedia

पर्यावरण विशेषांक 2023                                                   

                      पर्यावरण जनजागृती

पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना असून को आपल्या सभोवतालच्या संपूर्ण परिसराचा समावेश होतो. म्हणजे परिसरातील सर्वप्रकारचे सजीव, निर्जीव घटक सर्वांचा पर्यावरणात समावेश होतो. मानव आणि आपले सभोवतालचे पर्यावरणावर याचा संबंध ही खूपच धनिष्ठ अशाप्रकारचा आहे. किंबहूना मानवाचे जीवनच पर्यावरणावर आधारलेले आहे. यानुसार आपले अन्न, वस्त्र, निवारा राहणीमान यासर्वांवरच सभोवतालच्या पर्यावरणाचा प्रभाव दिसून येतो.

पर्यावरण - पृथ्वीवरील आपल्या सभोवतालचे  वातावरण म्हणजे ‘पर्यावरण’ अशी साधीसोपी, सुटसुटीत व्याख्या करता येईल. कारण पर्यावरणच मानवाचा खरा मित्र देखील आहे. याच्याच मदतीने- मानवाने प्रगतीची नवनवीन शिखरे आज सर केली आहेत. कारण पृथ्वीच्या अंतरंगापासून तर अंतराळातील इतर ग्रहापर्यंतची मजल मानवाने मारली आहे. स्वतःसाठी अनेक सुख-सुविधा मानवाने निर्माण केलेल्या आहेत. पर्यावरणाच्या मदतीने आपली प्रगतीकरता-करता आपण पर्यावरणाचा -हास करण्यास कारणीभूत ठरतो आहोत. यांची जाणीव उशीरा का होईना मानवाला झाली आहे. कारण यांचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला आज पहायला मिळतात. त्याचाच परिणाम म्हणजे मोठ्याप्रमाणावर घडून येणारे 'प्रदुषण'

पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक म्हणजे आजचे विविध प्रकारचे 'प्रदूषण' होय. मग प्रदुषण म्हणजे काय ? यांची कारणे ? यांचे परिणाम १ यांचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम यासर्व बाबीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. वेगवेगळे प्रदुषण, त्याची कारणे, त्याची दुष्परिणाम यासगळ्याचे गंभीर परिणाम मानवाबरोबरच संपूर्ण सजीवसृष्टीला भोगावे लागत असल्यामुळे 'पर्यावरणाला'- धोका निर्माण झाला आहे.

पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी, सजीवसृष्टीच्या संवर्धन, संरक्षण व संवर्धनासाठी. पर्यावरणाचे संरक्षण व  अत्यंत आवश्यक बनले आहे. जेणेकरून पर्यावरणाला अपायकारक घटक टाळून पर्यावरणासाठीपोषक घटकाच्या संवर्धनास मदत करणे म्हणूनच आज पर्यावरणरक्षणासाठी आज मोठयाप्रमाणावर 'पर्यावरण) जनजागृती ची गरज निर्माण झाली आहे.

पर्यावरण जनजागृती आपण पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण घटक असून, निसर्गाने जन्मतःच आपल्याला बुद्धीची देणगी दिलेली आहे. त्यामुळेच काळाची गरज ओळखून जीवसृष्टी टिकविण्यासाठी 'पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन' करण्याकरिता पर्यावरण जनजागृती करणे आज क्रमप्राप्त ठरते आहे. कारण जनजागृतीमुळे एकाच्या बाबीचे महत्त्व समजल्यानंतर लोक त्याबाबत जागृत होऊन त्यासाठी स्वतःदेखील प्रयत्न करू लागतात, त्यामुळेच आपल्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी मोठया प्रमाणावर पर्यावरण जनजागृती कार्यक्रम शासन मार्फत साजरे केले जातात. व समाजसेवी संस्था यांच्या मार्फत साजरे केले जातात.

* पर्यावरण जनजागृतीतील महत्वपूर्ण बाबी

1) आपले घर व आपला परिसर स्वच्छ राखणे.                                                                      2)मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन करणे.                                     3) प्लास्टीकचा वापर करणे टाळणे.                                               4) आपल्यामुळे कोणत्याही पद्धतीचे प्रदुषण होणार नाही, यांची काळजी घेणे

5)इंधनावर चालणाया वाहनाचा वापर कमीत कमी करणे.                 6)पर्यावरणाबाबत जनजागृती कार्यक्रमात सहभाग नोंदविणे.                           7) पाण्याची बचत करणे                                                 8)आपल्या परिसरातील झाडे, पशु-पक्षी यांची काळजी घेणे                           9) पर्यावरणासाठी अपायकारक असणाऱ्या बाबी टाळणे-                     10)पर्यावरणाचे संरक्षण करणे व संवर्धन करणे याला आपली जवाबदारी समजून वागणे.

अशाप्रकारे वरीलबाबीचा गांभीर्याने अवलंब केला तर पर्यावरण जनजागृतीसाठी आपली मदत होऊ शकते यामध्ये पर्यावरण जनजागृती' पुढील कार्यक्रम आपल्याला राबवता येतील. *

पर्यावरण जनजागृतीसाठी उपक्रम - कोणतेही कार्य हे एकट्याने करण्यापेक्षा समुहाने केल्यामुळे मिळणारे यश हे मोठे असते. याविचारानुरूप पर्यावरण जन जागृतीच्या दृष्टीने पुढील उपक्रम राबविता येतील,

1)वृक्ष लाव लागवड व संवर्धन कार्यक्रम                                         2) पाणी अडवा व पाणी जिरवा कार्यक्रम

3)आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावून संगोपन करणे                       4) लोकासाठी पर्यावरणाविषयक कार्यशाळाची व्यवस्था करणे.                5)भविष्यातील परिस्थितीची जाणीव करुन देणे.                                    6) पर्यावरणपुरक उपक्रम राबविणे.                                     7)समारंभप्रसंगी झाडे भेटवस्तू म्हणून देणे.                                8)पथनाय्य, जनजागृतीपर नाटिकाचे सादरीकरण करणे.

9) पर्यावरणविषयक नियम व कायदे कडक करणे.                             10) पर्यावरणाविषयी प्रत्येकाने जवाबदारीने वागणे

अशापद्धतीने 'पर्यावरण जनजागृतीच्या' माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन शक्य होईल, आणि सजीवसृष्टीच्या जतनासाठी महत्वाचे पाऊल ठरेल,म्हणूनच असे म्हणावे वाटते

.”पर्यावरण असेल चांगले तर जीवन राहील चांगले.”     

 श्री.निलेश नंदकुमार जोशी ,   

 जि.प.प्रा.शा.आवलगाव बु.ता.घनसावंगी जि.जालना